
गुहागर तालुक्यातील कुडली माटलवाडी येथून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह सापडला..
गुहागर तालुक्यातील कुडली माटलवाडी येथून महिनाभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आवरे येथील माळरानातील झाडीझुडपात आढळून आला आहे. संदीप बबन माटल असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे गुहागर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप माटल हे ४ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आपल्या कुडली माटलवाडी येथील राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेले होते. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा कोणताही पत्ता लागला नव्हता. अखेर १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास मौजे आवरे येथील माळरानातील जंगलमय परिसरात झाडीझुडपात एक मृतदेह स्थानिक ग्रामस्थांना दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, हा मृतदेह बेपत्ता असलेल्या संदीप माटल यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.www.konkantoday.com




