राज्यात गारपिटीचा हाहाकार! 12 जिल्ह्यांमध्ये संकट


मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहेत. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने धोक्याची घंटा वर्तवली आहे. गारपिटीसह जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात आज वादळी पाऊस आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला.बाकी संपूर्ण राज्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आहे, तरीही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. परभणी, बीड, जळगाव, पुणे, सातारा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी केला. बाकी संपूर्ण राज्यात आज पावसाचा येलो अलर्ट आहे. सकाळपासूनच अनेक भागात अवकाळी पावसाला सुरूवात झाली. हेच नाही तर मुंबईसह अन्य भागात ढगाळ वातावरण झाले.

कालपासून राज्याच्या अनेक भागात जोरदार अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामध्येच आजही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मालेगाव, मनमाड, सटाणा आणि कळवण परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली.

या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button