एसटी महामंडळाची ऐशी की तैसी,दापोलीत चक्क धावत्या एसटी बसचा पत्रा उडाला


प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाकडून नवनवीन घोषणा केल्या जात आहेतमात्र सध्या अस्तित्वात असलेल्या एसटी गाड्यांची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत आहे पावसाळ्यात अनेक गाड्या गळत आहेत तर अनेक गाड्यांना नादुरुस्त अवस्थेत असल्याने प्रवाशांना धोक्यात जीव घालून प्रवास करावा लागत आहे आज दापोली येथून सायंकाळी सुमारे ४:३० वाजता केळशीकडे जाणारी एसटी बस धावत असताना एक धक्कादायक प्रकार घडला. भरधाव वेगात असताना अचानक बसचा पत्रा उडाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळला.
या घटनेमुळे एसटी बसच्या देखभाल व दुरुस्तीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button