
आज रत्नागिरी शहरांत उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता
*महत्वाची सूचना :-रत्नागिरी नगर परिषदेच्या शीळ जॅकवेल येथील वीज पुरवठा काल संध्याकाळी झालेल्या वादळामुळे खंडित झाला आहे. वीज पुरवठा सुरळीत होणेसाठी आज दुपार पर्यंत वेळ जाणार आहे. असे एम यस ई बी कडून कळविण्यात आले आहे तरी आज शहरांत उशिराने व कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. याची सर्वांनी नोंद घेऊन उपलब्ध पाण्याचा योग्य काटकसरीने वापर करून नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे




