
छोटू देसाई क्रिकेट ऍकॅडमीच्या तिसर्या ऍस्ट्रो टर्फचे उदघाटन.
छोटू देसाई क्रिकेट ऍकॅडमीच्या तिसर्या ऍस्ट्रो टर्फचे उदघाटन
छत्रपती श्री शिवाजी स्टेडियमलगत कै. छोटू देसाई क्रिकेट ऍकॅडमीच्या तिसर्या ऍस्ट्रो टर्फचे उदघाटन नुकतेच झाले.
यावेळी आमदार व रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किरण सामंत, मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिला घोसाळकर, उद्योजक सुरेश गुंदेचा, जयू भाटकर, बिपिन बंदरकर, नगरसेवक बाळू साळवी, नगरसेवक सौरभ मलुष्टे, पूजा पवार, वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर मधुकर बोथले, सतीश साळवी या सर्वांचा छोटू देसाई क्रिकेट ऍकॅडमीचे अध्यक्ष गजेंद्रशेठ पाथरे व सचिव दीपक देसाई यांनी सत्कार केला.
खेळपट्ट्या तयार करण्यासाठी व ऍस्ट्रो टर्फसाठी रत्नागिरीतील दानशूर उद्योजक सुरेश गुंदेचा, गजेंद्र पाथरे, राजेश खातू, किशोर भुते, सौरभ मलुष्टे, राजू शेठ खातू यांनी मोलाची मदत केल्याचे दीपक देसाई यांनी सांगितले. त्यानंतर नवीन ऍस्ट्रो टर्फचे उदघाटन किरण सामंत यांच्या उपस्थितीत उर्मिला घोसाळकर यांनी फीत कापून माजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश साळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केले.www.konkantoday.com




