चिपळुणातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग कार पार्किंगसाठी


चिपळूण शहरातील पंचायत समितीसमोरील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग व तहसीलदार कार्यालयाकडे जाणारा अंतर्गत रस्ता कार पार्किंग बनला आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता असून अशा बेकायदेशीर पार्किंगवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.
येथे पंचायत समिती, तहसीलदार कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय अशी महत्वाची कार्यालये एकाच भागात आहेत. त्यामुळे दररोज या कार्यालयांमध्ये कामानिमित्त हजारो नागरिक येत असतात. यातील ५० टक्के नागरिक कार, दुचाकी घेऊन येतात. मात्र त्यांची वाहने पार्किंग करण्यासाठी यातील एकाही कार्यालयात व्यवस्था नाही. त्यामुळे नाईलाजास्तव अनेकांना रस्ते व मोकळया जागा बघून वाहने पार्किंग करावी लागतात. त्यामुळे या तिन्ही कार्यालयांमध्ये जाबचे म्हटल्यास वाहतूक कोंडी मिळणार नाही असा एकही दिवस नसतो. त्यामुळे याचा सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन कराव आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button