
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील ऍक्वा कंपनीतून १० लाखांचा ऐवज लंपास
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील ऍक्वा फूड एक्झीम कंपनीतून १० लाख रुपये किंमतीची मशिनरी लंपास केल्याप्रकरणी सोमवारी रात्री येथील पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धीरजलाल मंदूलाल बरूई यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ही घटना २५ फेब्रुवारी ते १४ मार्च यादरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. चिपळूण येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेकडे तारण असलेल्या कंपनीतील ४ मशिनचे कन्वेअर व मशिनचे प्रेशन वॉल्व्ह अज्ञात चोरट्याने लंपास केले. डेन्मार्क देशातून डॅनटेक फ्रिजींग सिस्टीम या कंपनीकडून विकत घेतलेले ७५० किलो वजनाचे साहित्यही लंपास केले. जवळपास ७ ते ८ मशिनरी – साहित्यांचाही समावेश असून सर्व साहित्यांची किंमत १० लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.www.konkantoday.com




