
आरोपीला पकडण्यासाठी मंडणगड पोलिसांनी अडीच हजार किलोमीटरचा केला प्रवास
मंडणगड तालुक्यातील दाभट परिसरातील सहा महिलांनी विश्वासाने जपून ठेवण्यास दिलेले सोन्याचे दागिने घेवून पोबारा केलेल्या चंद्रकांत तेरवणकर याच्या मुसक्या आवळून मंडणगड पोलिसांना त्याला मुद्देमालासह ताब्यात घेण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यासाठी मंडणगड पोलिसांनी रात्रंदिवस सुमारे अडीच हजार किलोमीटरहून अधिकचा प्रवास करून सापळा रचून ही कामगिरी केली. १० मार्च २०२६ रोजी चंद्रकांत तेरवणकर (रा. आंबळे, ता. चिपळूण) याच्या विरोधात मंडणगड पोलीस स्थानकात सोन्याचे दागिने लंपास केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.www.konkantoday.com




