नगर भूमापन मिळकतींमध्ये फेरफार नोंद घेण्याकामी इप्सित प्रणालीमध्ये नवीन ४ फेरफार प्रकारांची सुविधा सुरुhttps://epsit.mahabhumi.gov.in संकेतस्थळाचा वापर करुन सुविधेचा लाभ घ्यावा


रत्नागिरी, दि. 17 ) : नगर भूमापन मिळकतींमध्ये फेरफार नोंद घेण्याकामी इप्सित प्रणालीमध्ये नवीन ४ फेरफार प्रकारांची सुविधा सुरु झाली आहे. तरी नागरिकांनी https://epsit.mahabhumi.gov.in या संकेतस्थळाचा वापर करुन जास्तीत जास्त प्रमाणात या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी सोनल काळे यांनी केले आहे.
इप्सित प्रणालीद्वारे यापूर्वी पुरविण्यात आलेल्या फेरफार प्रकारामध्ये वारसनोंद, खरेदीनोंद, हक्क सोडपत्र नोंद, बक्षीसपत्र नोंद, गहाणखत नोंद इत्यादी सेवा पुरविण्यात आलेल्या असून आता
या प्रणालीदवारे नवीन १) नोंदणीकृत मृत्युपत्र / इच्छापत्र २) अनोंदणीकृत मृत्युपत्र/इच्छापत्र ३) भाडेपट्टा नोंद ४) एकत्र कुटुंब मॅनेजर (ए. कु. मॅ. नोंद कमी करणे) या चार नोंदीचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत एकूण ९ फेरफार प्रकार इप्सित प्रणालीद्वारे नागरिकांसाठी ऑनलाईन फेरफार अर्ज करण्याकामी उपलब्ध झाले आहेत.
इप्सित म्हणजेस इलेक्टॉनिक प्रॉपर्टी सिस्टीम इंटीग्रेटेड टूल या प्रणालीद्वारे मिळकत पत्रिकांमध्ये फेरफार अर्ज ऑनलाईन करण्याची सुविधा असून, या नोंदीसाठी अर्जदार घरी बसून अर्ज करु शकत असल्याने या प्रणालीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता याचे उत्तम उदाहरण ही प्रणाली ठरली आहे.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button