चिपळुणात ‘आरोही–सायबर सुरक्षित नारी’ जनजागृती व सन्मान सोहळा

आरोही नारी सन्मानाने विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान : सायबर तज्ञ धनंजय देशपांडे यांचे मार्गदर्शन 


चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) – WDW महाराष्ट्र आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने “आरोही – सायबर सुरक्षित नारी, डिजिटल सक्षम नारी” राज्यस्तरीय जनजागृती व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात सायबर सुरक्षा जनजागृती, IMA WDW महाराष्ट्र महिला डॉक्टर्स राज्यस्तरीय हेल्पलाईनचा शुभारंभ, “आरोही नारी गौरव पुरस्कार” प्रदान, तसेच विशेष सांस्कृतिक सादरीकरण आणि “डिजिटल जागर” जनजागृती कार्यक्रम पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, आयएमए अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, सहसचिव डॉ. उज्ज्वला बर्दापूरकर, सायबर तज्ञ धनंजय देशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, नगरसेविका यांच्यासह आयएमएचे पदाधिकारी, पोलीस अधिकारी, तसेच नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

या प्रसंगी सायबर सुरक्षेवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात डॉ. विपिन चेकर, पोलीस अधिकारी स्मिता सुतार, डॉ. अतुल ढगे, पत्रकार सतीश कदम, डॉ. विकास कुमरे, ॲड. अनुपमा ठाकूर, अमोल तारी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले व सायबर तज्ञ धनंजय देशपांडे यांनी सहभाग घेतला. पॅनल समन्वयक म्हणून डॉ. नीलेश नाफडे व डॉ. कांचन मदार यांनी काम पाहिले.

यावेळी आरोही नारी गौरव पुरस्काराने पत्रकार अनघा निकम, सीमा चाळके, संगीता लोटे, रंजीता चॅरिटेबल ट्रस्टच्या रंजिता ओतारी, दीप्ती सावंत देसाई आणि नगरसेविका राणी महाडिक यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात संजीवनी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी “मायाजाल” हे सायबर जनजागृतीपर सादरीकरण केले, तर छावा इव्हेंटतर्फे नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद खेरटकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button