राजापूर तालुक्यातील नाटेमध्ये बंद घर फोडून तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला


राजापूर तालुक्यातील नाटे येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख ९१ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि १ लाख रुपये रोख, असा एकूण ३ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना ४ मार्च रोजी दुपारी १२ ते ५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रोशन मोठाभाऊ बच्छाव (२७, रा. चिंचवड, ता. मालेगाव, जि. नाशिक)  हे सध्या नाटे येथील यश होम स्टेच्या मागे विलास शहाणे यांच्या घरात भाड्याने राहतात. ते एका कंपनीत प्रोजेक्ट सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे घर बंद असताना चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. आपल्या घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच रोशन बच्छाव यांनी ६ मार्च रोजी नाटे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button