रत्नागिरीत मराठी भाषा दिनानिमित्त स्वाक्षरी अभियान; धर्मसीभाई चौहान यांचा विशेष सन्मान


रत्नागिरी :
Rotary Club of Ratnagiri यांच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी स्वाक्षरी अभियान उत्साहात पार पडले. मराठी भाषेचा गौरव व प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, नगरसेविका प्रीती सुर्वे व वर्षा ढेकणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत दैनंदिन व्यवहारात मराठीचा अभिमानाने वापर करण्याचे आवाहन केले

तसेच, रोटरीतील ५० वर्षांची उल्लेखनीय कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल श्री. धरमसीभाई चौहान यांचा विशेष मान-सन्मान नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या दीर्घकालीन सेवेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

या प्रसंगी अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, सचिव रोहित विरकर, खजिनदार स्वप्निल साळवी, धरमसीभाई चौहान, रूपेश पेडणेकर, निलेश मुळे, धीरज वेल्हाळ, पवार साहेब, मंदार पवार, मकरंद भुरके, राजीव देवळे, केतन गांगण, वेदा मुकादम, सचिन मुकादम, राहुल पंडित, देवयानी वाघधरे, माधुरी कळंबटे, परेश साळवी, विनायक हातखांबकर, प्रसाद हातखांबकर, इंदुलकर मॅडम, नमिता कीर, आनंद चौगुले, कल्पेश पटेल, सुरेंद्र यरम, राजेंद्र यादव, मंदार सावंतदेवसाई, राजेंद्र घाग तसेच इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून कार्यक्रम आनंददायी वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button