मुंबई-गोवा महामार्गावर लांज्या जवळ ट्रक उलटूनभीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू


मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील धनावडे शेती फार्मसमोर सोमवारी दुपारी एक भीषण अपघात झाला मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने सुरक्षा भिंतीला आणि दिशादर्शक फलकाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर ट्रक महामार्गावरच पलटी झाला, ज्यामध्ये ट्रकचा चालक केबिनखाली चिरडला जाऊन त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला
.सोमवारी दुपारी साधारण १२:४५ वाजता
चालक जितेश मसालिया हा मालवाहू ट्रक घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. धनावडे शेती फार्मजवळ रस्ता सरळ आणि वळणाचा असतानाही, चालकाने वेगावर नियंत्रण न ठेवल्याने ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरक्षा भिंतीला आणि फलकाला धडकला. धडक इतकी भीषण होती की ट्रक उलटला आणि चालक केबिनमध्ये अडकला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button