
चिपळूणमध्ये घरातील सोन्याचा हार चोरीस; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
चिपळूण तालुक्यात महालक्ष्मी नगर परिसरात राहत्या घरातून सोन्याचा हार चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.३० वाजल्यापासून ते ०४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत शहरातील खेड महालक्ष्मी नगर, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे घडली.
याप्रकरणी तक्रारदार मधुबाला श्रीराम दुर्गे (वय ५७, रा. खंड महालक्ष्मी नगर, चिपळूण) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार शिल्पा निरंजन दुर्गे (वय ३०, रा. कौंढर ताम्हाणे, तावडेवाडी, ता. चिपळूण) हिने फिर्यादी यांच्या राहत्या घरातील कपाटात ठेवलेला २४.४०० ग्रॅम वजनाचा, अंदाजे १,४४,००० रुपये किंमतीचा जुना वापरता सोन्याचा हार चोरून नेला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
www.konkantoday.com




