महाबळेश्वर कडे जाणाऱ्या आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा जळालेला अवस्थेतील मृतदेह सापडला, खून करून करून मृतदेह घाटात टाकल्याची शक्यता


पोलादपूर वरून महाबळेश्वर कडे जाणाऱ्या आंबेनळी घाटात पोलादपूर तालुक्याच्या हद्दीत बावलीटोकच्या खालील बाजूला आणि चिरेखिंड गावाच्या वरील मुख्य घाटरस्त्यालगत अज्ञात महिलेचा जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे सदरचा मृतदेह काँक्रीटच्या भिंतीच्या मोरीच्या पाईपामध्ये लपवून ठेवण्यात आला होता त्यामुळे सुरुवातीला तो कोणाच्या नजरेत आला नाही मात्र या मृतदेहाची परिसरामध्ये दूर्गंधी बसल्याने लोकांनी शोध सुरू केला तेव्हा ही घटना उघडकीस आली अधिक शोध घेता आंबेनळी घाटातील रस्त्याचे काम करणाऱ्या कामगारांना हा धक्कादायक प्रकार आढळून आला

महिलेच्या खुनानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी जाळले असण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तविण्यात आली असून ही नेमकी महिला कोण आहे याची अद्याप ओळख पटलेली नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button