
जिल्ह्यात लहान भावाचा एकाही हट्ट मोठ्या भावाने पूर्ण केला नाही
राज्यात भाजप हा मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ आहे .रत्नागिरी जिल्ह्यात मात्र भाजपला नेहमीच लहान भावाची भूमिका बजावावी लागत आहे यामुळे दरवेळीप्रमाणे मोठा भाऊ म्हणेल त्याप्रमाणे जिल्ह्यात लहान भावाला ऐकावे लागत आहे. एरवी घरातील मोठा भाऊ लहान भावाने एखादे चॉकलेट कधीतरी मागितले तरी देतो मात्र रत्नागिरी जिल्ह्यात मोठा भाऊ लहान भावाचा एकही हट्ट पुरवण्यास तयार नाही लहान भाऊ किती रागावला रुसला तरी शेवटी मोठा भाऊ म्हणेल त्याचप्रमाणे करतो याची मोठ्या भावाला देखील खात्री आहे त्यामुळे लहान भावाच्या बाल हट्टाकडे मोठा भाऊ फारसे लक्ष देत नाही असे सध्या तरी चित्र आहे
www.konkantoday.com