पटवर्धन हायस्कूल केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

रत्नागिरी : आजपासून माध्यमिक शालांत परीक्षेला (इ. दहावी) सुरुवात झाली असून, शहरातील पटवर्धन हायस्कूल केंद्रावर दहावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

केंद्र संचालक रूपेश पंगेरकर, उपकेंद्र संचालक अमर लवंदे, संदीप कांबळे, मुख्याध्यापक जानकी घाटविलकर, कार्यवाह धनेश रायकर यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षकांनी केंद्रावर परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. प्रातिनिधिक स्वरूपात सर्व सहभागी शाळांतील विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच परिरक्षक श्री. गोरे, त्याचबरोबर पोलीस कर्मचारी सर्व शाळेतील पर्यवेक्षक या सर्वांचेही स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button