मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पूल एका एका बाजूने वाहतुकीला खुला;


मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी पुलाचे काम पूर्ण होत आले आहे. या पुलावरून एका मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवास सुखकर झाला आहे. दोन्ही बाजूची वाहतूक सुरू होण्यासाठी जून महिना उजाडेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.महामार्गावरील चिपळूण, संगमेश्वर बसस्थानक, बावनदी, पाली, लांजा बाजारपेठ येथील पुलांची कामे अपुरी राहिल्यामुळे मुंबई ते गोवा प्रवासात पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत यासाठी आंदोलनेही करण्यात आली होती.

त्यामुळे ही कामे प्रगतिपथावर आहेत. त्यातील बावनदी येथील सुमारे ७०० मीटर लांबीच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. प्रत्यक्ष पूल २१० मीटरचा असून, जोडरस्ते ३०० व २०० मीटर लांबीचे आहेत.

निवळी घाट संपला की, बावनदीचा पूल सुरू होतो. दोनच दिवसांपूर्वी पुलावरून एका बाजूने वाहतूक सुरू केली आहे. पूल वाहतुकीस सुरू झाल्यामुळे खड्ड्यांतून होणारा प्रवास सुखकर झालेला आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button