
अवघ्या पाच तासात मुंबई ते सिंधुदुर्ग रो रो सेवा एप्रिलमध्ये सुरू होणार
गेले अनेक दिवस चर्चेत असलेली आणि मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सहा महिन्यापूर्वी ज्यांची ट्रायल झाली ती बहुप्रशिक्षित मुंबई-कोकण रो रो सेवा आता एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. हा प्रवास पाच तासात पूर्ण होणार असून मुंबई भाऊचा धक्का येथून सुटणारी रो रो बोट पाच तासात विजयदुर्गला पोहोचणार आहे. यामुळे मुंबई गोवा महामार्गाचा १२ तासांचा प्रवास करणार्या वाहनचालकांना गाडीसह गावी पोहोचणे शक्य होणार आहे.
मुंबई विजयदुर्ग प्रवास केवळ पाच तासामध्ये करता यावा, यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई विजयदुर्ग रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नियुक्ती करण्याकरिता सागरी मंडळाने नुकत्याच निविदा प्रसिद्ध केल्या. ही निविदा प्रक्रिया मार्चपर्यं पूर्ण करून एप्रिलमध्ये मुंबई विजयदुर्ग रो रो सेवा सुरू होवू शकेल.
www.konkantoday.com




