‘साळगांव ची आडसारा’ गृप चा अभिनव प्रयोग,गुणवंत विद्यार्थ्याला व्यासपीठावर अध्यक्षस्थान चा मान.

शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी, जि. प. शाळा साळगाव नं १ येथे स्वातंत्र्यदिन विशेष स्पर्धा आयोजित केल्या होत्या. ‘जुनिअर बॉईज मित्रमंडळ साळगाव’ पुरस्कृत आणि ‘साळगाव ची आडसारा’ आयोजित, वेशभूषा, रंगभरण, वक्तृत्व, निबंध स्पर्धा पार पडल्या.

साळगाव ची आडसारा’ गृप एक नवीन पायंडा सुरुवात करत आहे. मुलांच्या स्पर्धा, उपक्रम ज्यावेळी आयोजित केल्या जातील, तेव्हा अध्यक्ष, प्रमुख पाहूणे, मान्यवर यांच्या समवेत विद्यार्थ्यापैकी एका गुणवंत विद्यार्थी / विद्यार्थिनी ची निवड करून व्यासपीठावर स्थानापन्न करण्यात येईल. व कार्यक्रमाचे उदघाटन ही त्या विद्यार्थ्यांचे हस्ते करण्यात येईल. या प्रयोगा अंतर्गत या स्पर्धे वेळी पहिलाच मान हा जि. प. शाळा साळगाव नं १ या प्रशालेची इयत्ता ६वी मध्ये शिकत असलेली गुणवंत विद्यार्थिनी कु. स्वरा सत्यवान तावडे हिला देण्यात आला. स्वरा तावडे या मुलीच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
व्यासपीठावरील महनीय हस्तींसोबत गुणवंत विद्यार्थ्याला स्थान देण्याचा हा अभिनव प्रयोग योजन्यामागे ‘साळगाव ची आडसारा’ गृप चा असा उद्देश आहे की, गावातील प्रत्येक मुलाने कोणत्याही क्षेत्रात सहभागी होऊन यशस्वी होऊन व्यासपीठावरील मान स्वीकारण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे.

व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. कविता पालव, सहशिक्षिका सौ. प्राजक्ता कन्याळकर, सौ. स्मिता अवसरे, सौ. नीला भिसे, सौ. सपना साळगावकर, श्रीम. परब हे उपस्थित होते. श्री. गजानन पवार, सिद्धी मेस्त्री, डॉ. श्रीधर मेस्त्री, गुरुनाथ गावडे, मकरंद साळगावकर, बाबाजी सावंत, तुषार जाधव, विकास सावंत, विश्वजीत केसरकर, राजेश कारेकर, निलेश पवार, सत्यवान चव्हाण, अक्षय कारेकर, वामन गुरव, निलेश सावंत, माजी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button