खेडमध्ये जि. प. पं. स. च्या १६ उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त

जि. प. मतदार संघात १४७१ तर पं. स. मतदार संघात १३०६ नोटाला मतदान


खेड : तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जि. प. च्या ७ पैकी केवळ दयाळ गटातील ३ उमेदवारांच्या तर पंचायत समितीच्या १४ गणापैकी ६ गणांतील १२ अशा एकूण १६ उमेदवाराच्या अनामत रक्कमा जप्त झाल्या आहेत. तर जि. प. च्या ७ गटामध्ये मशीनद्वारे १४६७ व टपालीमते ४ अशी एकूण १४७१ मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. तर पंचायत समितिच्या १४ गणांमध्ये १२९४ मशीन व टपालीद्वारे १२ असे एकूण १३०६ मतदारांनी नोटाला मतदान केले आहे.
येथील तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार केवळ दयाळ जि. प. गटातील चंद्रसेन प्रभाकर मोहिते १५८ मते, इनायतुल्ला अ. रहिमान १४३ मते, विजय महादेव राक्षे ११४४ मते या उमेदवारांची प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे तीन हजार रुपये अनामत रक्कम जप्त झाली आहे. तसेच लोटे पंचायत समिती गणातील विपुल विलास तांबे ११० मते यांची ७०० रुपये अनामत, गुणदे गणातील रत्नाकर दगडू कारेते ५८५ मते, प्रकाश शंकर पालांडे ५९ मते व बबन धोंडू जाधव ६६ मते या तीन उमेदवारांची २१०० रक्कम, विराचीवाडी गणातील मधुकर रामचंद्र शिंगे २३२ मते व दिनेश सुरेश पोफळकर ८६ मते या दोन उमेदवारांची ७०० अनामत, अंजनी पंचायत समिती गणातील राबिया नासीर जसनाईक १३१ मते व अभिलाषा सागर जाधव ३४२ मते यादोघांची १४०० अनन्मात रक्कम जप्त. भरणे गणातील मिलिंद बाळाराम गमरे १८६ मते व प्रशांत प्रकाश मंडलिक ३८ मते या दोघांची १४०० अनन्म्त रक्कम जप्त आणि तिसंगी पंचायत समिती गणातील किशोर गणेश जाधव ५३९ मते व सामजिक कार्यकर्ते चंद्रकांत लक्ष्मण मोरे ७२ मते या दोघांची १४०० रुपये अनामत रक्कम जप्त झाली आहे. अशी एकूण जि. प. च्या ३ उमेदवारांची ३००० अनामत, प स च्या १० खुल्या प्रवर्गातील १० हजार व राखीव प्रवर्गमधील २ उमेदवाराची ७०० अशी एकूण १०७०० मिळून एकूण अनामत रक्कम १३७०० जप्त झाली आहे.
जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये नोटाला मतदान करण्याची किमया मतदारांनी केली आहे. जि. प धामणदिवी गटात १४३, वीराचीवाडी गटात २४८, दयाळ गटात १०१, भडगाव गटात १७४, भरणे गटात ३३५, सुकिवली गटात २८६ व लोटे गटात १८४ असे एकूण १४७१ नोटाला मतदान झाले असून यापैकी ४ मते टपाली आहेत. तसेच पंचायत समितीच्या सुकिवली गणात ८७, तिसंगी गणात ७३, खवटी गणात १९२, भरणे गणात ९१, भडगाव गणात १०५, जामगे गणात ११२, दयाळ गणात १२८, बहिरवली गणात १३०, गुणदे गणात ६१, वीराचीवाडी गणात ७४, लोटे गणात ६१, आंबडस गणात १००, अंजनी गणात ९० आणि धामणदिवी गणात १३७ असे एकूण १३०६ नोटाला मतदान झाले असून यापैकि १२ मते टपाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button