
रत्नागिरीतील जिलानी मरीन प्रो.या कंपनीचीतब्बल 1 कोटी 59 लाख रुपयांची फसवणूक
इटली येथील कंपनीसाठी रत्नागिरीतील जिलानी मरीन प्रो.या कंपनीकडून तब्बल 24 टन मत्स्य मालाची मागणी करुन त्या मालाची तब्बल 1 कोटी 59 लाख रुपयांची रक्कम परस्पर लाटली.याप्रकरणी कर्नाटक येथील मध्यस्थ किशोर कुमार आणि कंपनी (एक्सपोर्टस) या कंपनीच्या संचालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना 6 सप्टेंबर 2025 ते 13 नोव्हेंबर 2025 या कालावधीत घडली आहे.
श्रीधरन किशोर कुमार (रा.जी.एच.एस रोड मँगलोर,कर्नाटक) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित संचालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात जिलानी कंपनीचे अकाउंट मॅनेजर हैदरअली शब्बीर सनदी (35,मुळ रा.कोल्हापूर सध्या रा.मिरजोळे,रत्नागिरी) यांनी शनिवार 14 फेब्रुवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित श्रीधरन कुमार याने इटलीमधील अर्दिमार एस.आर.एल या कंपनीसाठी 6 सप्टेंबर 2025 ते 13 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जिलानी कंपनीकडून एकूण 24 टन मत्स्य प्रजातीच्या मालाची मागणी केली होती.
या मालाची रक्कम जिलानी कंपनीला वेळेत देण्याबाबत कंपनीचा विश्वास श्रीधरन कुमारने संपादित करुन 24 टन माल स्विकारुन तो इटलीतील अर्दिमार एस.आर.एल कंपनीला पुरवला. परंतू इटलीतील कंपनीकडून मालाचे मिळालेले तब्बल 1 कोटी 58 लाख 75 हजार 240 रुपये संशयिताने जिलानी मरीन प्रोड. कंपनीच्या बँक खात्यात जमा न करता कंपनीची आर्थिक फसवूणक केली करत विश्वासघात केला




