
केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार–प्रसार अभियानांतर्गत महिला संमेलन उत्साहात संपन्न

केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार–प्रसार अभियान २०२४ अंतर्गत आयोजित महिला संमेलन यशस्वीरीत्या पार पडले. या संमेलनाच्या प्रमुख वक्त्या म्हणून मुग्धा करंबेळकर (सीए) यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले
हे संमेलन महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते.
यावेळी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातील महिला, स्वयंरोजगार, बचत गट, स्टार्टअप आणि आर्थिक सबलीकरणासंबंधी विविध योजनांची माहिती देण्यात आली.
🔴कार्यक्रमास महिला मोर्चा शहराध्यक्ष भक्ती दळी, नगरसेविका मानसी करमरकर, सुप्रिया रसाळ तसेच महिला मोर्चाच्या मंडळ अध्यक्ष सौ सुचिता नाचणकर उत्तर रत्नागिरी मधील स्नेहा चव्हाण व महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.🔴
♦️यावेळी प्रमुख वक्त्या मुग्धा करमळकर यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींचा महिलांना कसा फायदा होऊ शकतो, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.♦️
️⃣महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले.️⃣
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.



