
दापोली तालुक्यातील रुई जाधव मुंबईची श्रावण क्वीन
दापोली २६:- आयुष्यातील कोणता एक निर्णय बदलायला आवडेल आणि का? या पेचात टाकणाऱ्या प्रश्नाचे अवघ्या ९० सेकंदाच्या आत रुईने अचूक उत्तर देत महाराष्ट्र टाइम्स चा मुंबई श्रावण क्वीन किताब पटकावला.
नुकत्याच मुंबई येथे संपन्न झालेल्या मुंबई श्रावण क्वीन स्पर्धेत मूळच्या दापोली तालुक्यातील शिरशिंगे येथील रुई रवींद्र जाधव हिने श्रावण क्वीन चा किताब पटकावला आहे.
शिक्षण, कला, व्यवसाय आणि प्राणीकल्याण अशा चौकोनात रुई रुइने मास मीडिया जरनॅलिझममध्ये पदवी घेतली. एमजीएम युनिव्हर्सिटी ॲन्ड युनिसेफमधून तिनी ग्रीन जरनॅलिझममध्येही शॉर्ट कोर्स केला. हे करत असताना तिनं कलाही जोपासलेय. ती फिल्म मेकिंगचे धडे घेत आहे. यात तिचा मुख्य विषय दिग्दर्शन हा आहे. वेब सीरिजमध्ये तिनं काम केलंय. व्यावसायिक नाटकातही काम करते आहे. सध्या कथक शिकत आहे. मर्दानी खेळाचं प्राथमिक प्रशिक्षणही तिनं घेतलंय. तिच्यात कवयित्रीही दडलेली आहे. ‘युवर्स लविंगली, रु’ हा तिचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे. तिचा अंबर हा स्टायलिंग स्टुडिओही आहे. हे सर्व करत असतानाच रुई मुका फायनान्स च्या बाबतीत खूप संवेदनशील आहे ती दररोज ३० ते ३५ कुत्र्यांना खाऊ घालते. तसंच तिच्या कलागुणांच्या जोरावर तिनं आजवर अनेक पारितोषिके मिळवली आहेत. आता श्रावणक्वीनच्या मंचावर तिनं स्वत:ला नव्यानं सिद्ध केलं आहे.
तिच्या या यशामुळे दापोलीच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेला आहे.




