
मेर्वी श्री स्वामी मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा झाल्यानंतर ९ वाजता स्वामी पादुकांवर अभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. १२.३० वाजता आरती झाल्यानंतर १ वाजता महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी सहदेव पावसकर यांनी केले आहे.




