
भरणानाका येथील जुगार/मटका अड्डय़ावर पोलीसांची धाड !
१४९२/- रुपयांचा मुद्देमाल जप्त., गुन्हा दाखल
खेड : – मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणानाका येथील हाॅटेल सन्मानाच्या पाठीमागच्या बाजुस सुरु असलेल्या अवैध व बेकायदेशीर जुगार/मटका अड्डय़ावर पोलीसांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:४०वाजता धाड टाकून १४९०/- रोख रक्कम व २/- रुपयाचे जुगाराचे साहित्य असा एकूण १४९२/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयीत आरोपी अशोक विश्राम यादव ( वय ४७, रा. समर्थनगर, भरणे, ता. खेड) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई सोहेल इकबाल ढगे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.



