रत्नागिरी शहरा जवळील गयाळवाडी फाट्यावर डंपर–कार अपघात, तीन महिला जखमी


रत्नागिरी–हातखंबा मार्गावरील गयाळवाडी फाटा येथे डंपर आणि कार यांच्यात काल सायंकाळी अपघातात कारमधील तीन महिला जखमी झाल्या. ही घटना काल रविवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातात स्वरांगी सुरेश पवार (वय ४५), मंजिरी मकरंद परकर (वय ३०) आणि सरोजनी दाजी पवार (वय ६८, रा. आरवली, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या तीन महिला जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (एमएच-०८ बीके ४९७७) हा रत्नागिरीहून हातखंबा दिशेने जात असताना गयाळवाडी फाटा येथे या डंपरची कारला जोराची धडक बसली. या धडकेत कारचे मोठे नुकसान झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button