मुंबईजवळ समुद्रात तेलाची तस्करी करणारी तीन जहाजं तटरक्षक दलानं पकडली


भारतीय तटरक्षक दलानं मुंबईजवळ समुद्रात मोठी कारवाई केली आहे. तेलाची तस्करी करणारी तीन जहाजं तटरक्षक दलानं पकडली आहेत. या जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल साठा होता. ही परदेशी जहाजं समुद्रात तेलाची तस्करी करत होती.शुक्रवारी एका जटिल समु्द्र-हवाई नेटवर्कवर आधारित ऑपरेशनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय तेल तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

रॅकेटचा भाग असलेल्या जहाजांनी संघर्षग्रस्त देशांमधून मोठ्या प्रमाणात स्वस्त तेल आणि तेल आधारित वस्तूंची तस्करी करुन आर्थिक फायदा कमावण्याचा मार्ग निवडला होता. ही जहाजं आंतरराष्ट्रीय समुद्रात वस्तूंची देवाणघेवाण करायची. या सिंडिकेटमध्ये काम करणारे हस्तक अनेक देशांमध्ये सक्रिय आहेत. जहाजं खोल समुद्रात असताना त्यांच्यात समन्वय राखण्याचं काम हस्तकांकडून केलं जातं.

मुंबईपासून जवळपास १०० नॉटिकल मैलांवर पश्चिम दिशेला भारतीय तटरक्षक दलानं तीन जहाजं थांबवली. तटरक्षक दलाचे कर्मचारी या जहाजांवर गेले. त्यांची झडती घेण्यात आली. कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. चालक पथकाची चौकशी केली गेली. त्यातून जहाजांचा वापर तेलाच्या तस्करीसाठी होत असल्याचं स्पष्ट झालं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button