पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकरची कार बहिणीच्या ताब्यात देण्याचे आदेश


राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा चिरडून खून करण्यात आलेली आरोपी पंढरीनाथ आंबेरकरची थार गाडी फायनान्स कंपनीने ओढून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंबेरकर याची थार गाडी पुन्हा ताब्यात मिळावी यासाठी न्यायालयापुढे अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार आता आंबेरकर याची थार गाडी त्याची बहिण प्रतीक्षा खडपे हिच्या ताब्यात देणयाचे आदेश रत्नागिरी सत्र न्यायालयाकडून देण्यात आले.
पत्रकार शशिकांत वारिशे हे ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १ च्या सुमारास राजापूर पेट्रोल पंपातून आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडले होते. यावेळी पंढरीनाथ आंबेरकर याने महिंद्रा थार गाडी (एम.एच. ०८ एएक्स ६१००) खाली वारिशे याचा चिरडून खून केला असा आरोप आंबेरकर याच्यावर ठेवण्यात आला होता.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button