रत्नागिरीत प्राध्यापकाकडून लग्नाचे अमिष दाखवून विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार


रत्नागिरी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून 2021 ते 2026 या कालावधीत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका प्राध्यापकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

दिलीप ज्ञानेश्वर जाधव (वय 45, मूळ रा. सावर्डे, चिपळूण, सध्या रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित प्राध्यापकाचे नाव आहे. पीडिता इयत्ता दहावीत असतानाच त्याची तिच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर पीडिता अकरावीसाठी संबंधित महाविद्यालयात शिक्षण घेऊ लागल्यानंतर संशयित प्राध्यापकाने तिच्याशी जवळीक साधत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, संबंधित प्राध्यापकाने लग्नास स्पष्ट नकार दिल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे शहर पोलिसांनी संशयित प्राध्यापकाविरोधात भारतीय दंड विधान कलम 64(1), 64(2)(फ), 69, 351 तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button