मेजर सुमेध कुलकर्णी यांचे ‘समुराई : एक तपस्वी’ हे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित

रत्नागिरी / प्रतिनिधी –
निवृत्त लष्करी अधिकारी मेजर सुमेध रवींद्र कुलकर्णी यांचे ‘समुराई : एक तपस्वी’ हे पहिले मराठी पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. मराठी भाषेत लिहिलेले हे पुस्तक जपानी समुराई योद्धे आणि त्यांच्या आचारसंहितेच्या रूपाने ओळखल्या जाणाऱ्या बुशिडो तत्त्वज्ञानावर आधारित आहे.

या पुस्तकामध्ये सन्मान, शिस्त, निष्ठा, आत्मसंयम आणि कर्तव्यभावना यांसारखी मूल्ये सोप्या व व्यावहारिक पद्धतीने मांडण्यात आली असून, ही मूल्ये दैनंदिन जीवनात कशी अंगीकारता येतील यावर विशेष भर देण्यात आला आहे. समुराई योद्ध्यांच्या जीवनशैलीतून आजच्या काळातील व्यक्तीने कोणते धडे घ्यावेत, याचे सविस्तर मार्गदर्शन या पुस्तकातून करण्यात आले आहे.

हे पुस्तक सर्व वयोगटांतील वाचकांसाठी उपयुक्त असून, विशेषतः तरुण पिढीने वैयक्तिक, शैक्षणिक तसेच व्यावसायिक जीवनात या मूल्यांचा अंगीकार करावा, या उद्देशाने पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.

या पुस्तकास निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोर्कर (परमविशिष्ट सेवा पदक, युद्धसेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, शौर्यपदक, विशिष्ट सेवा पदक) यांची प्रस्तावना लाभली असून, त्यामुळे पुस्तकाच्या दर्जाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button