
रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ नागरिक सुहास सोहोनी यांचे मरणोत्तर देहदान
रत्नागिरी शहरातील सुभाष रोड परिसरातील रुपाजी सोसायटी येथील ज्येष्ठ नागरिक सुहास प्रल्हाद सोहोनी. (८०), यांचे ३ फेब्रुवारी रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. जानेवारी २०२५ रोजी सुहास सोहोनी व त्यांची पत्नी शोभा सोहोनी यांनी वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व संशोधनासाठी देहाचा उपयोग व्हावा या उद्देशाने देहदान केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे सुहास सोहोनी यांचा मरणोत्तर. देहदान ईच्छापत्र भरण्यात आले होते. त्यांच्या स्वतःच्या व कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे मंगळवारी करण्यात आले. येथे १८ वे देहदान ठरले आहे. कै. सुहास सोहोनी यांच्या पश्चात पत्नी शोभा सोहोनी, मुलगा राहुल सोहोनी तसेच नातवंडे असा परिवार आहे.
या मरणोत्तर देहदानाच्या वेळी सोहोनी यांचा मुलगा राहुल सुहास सोहोनी नातेवाईक आणि मित्रपरिवार आनंद जोशी, राजू जोशी, प्रकाश सोहोनी, दत्तात्रय सोहोनी, प्रवीण लिमये, आयुष लिमये, दिनेश सोहोनी, सुभाष गानू, प्रदीप आगाशे, विनायक शितूत,
समीर जोशी, स्वप्नील गानू, सुहास विद्वास उपस्थित होते.
www.konkantoday.com




