
दापोली तालुक्यातील टाळसुरेमध्ये २५ हजाराच्या सुपारीची चोरी.
दापोली तालुक्यातील टाळसुरे येथील मयुरेश देविदास करमरकर यांच्या गोठ्यात ठेवलेली सुमारे २५ हजार रुपयांच्या सुपारीची सहा पोती चोरट्याने चोरून नेल्याची घटना २९ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी ’दिलेल्या माहितीनुसार मयुरेश करमरकर (३८, टाळसुरे) यांनी आपल्या राहत्या घराला लागून असलेल्या गोठ्यामध्ये कच्च्या ओल्या सुपारीच्या ६ गोणी भरून ठेवलेल्या होत्या. २९ जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी उठले असता त्यांनी गोणी जाग्यावर दिसली नाहीत. सुमारे २५ हजार रुपये किमतीच्या या गोणी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची फिर्याद १ फेब्रुवारी रोजी त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली. याप्रकरणी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.
www.konkantoday.com




