रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथे टेम्पोच्या धडकेत पादचारी जखमी


रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथे टेम्पोच्या धडकेत पादचारी जखमी झाला. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. मिथुन दत्ताराम घाणेकर (तरवळ मायंगडेवाडी, रत्नागिरी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरण पोलिसांनी टेम्पोचालक परेश भालचंद्र महाकाळ (आगरनरळ, रत्नागिरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. परेश हा ३१ जानेवारी रोजी आपल्या ताब्यातील टेम्पो (एमएच ४८ एजी ३९७९) घेऊन रत्नागिरी ते आगरनरळ असा जात होता. जाकादेवी येथे रस्त्याने चालत जाणार्‍या मिथुन घाणेकर यांना परेश याच्या ताब्यातील टेम्पोची धडक बसली अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button