‘देवखेळ’ या वेबसिरीजमध्ये आपल्या संस्कृतीला बाधा करणारे असेल तर थांबवले जाईल, पालकमंत्री उदय सामंत


’देवखेळ’ या वेबसिरीजमध्ये आपल्या संस्कृतीला बाधा करणारे काही असेल तर ते थांबवले जाईल, विरोधक विकासावर बोलत नाहीत. ते कुठेतरी समाजाचे राजकारण करत असल्याची टीका पालकमंत्री उदय सामंत यांनी शृंगारतळी येथे आयोजित शिवसेना – भाजप महायुतीच्या प्रचारसभेत केली. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, ’देवखेळे’ व ’नमन’ ही लोककला संस्कृती जपण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझ्यावर सोडून द्या. कारण हे देवखेळे व नमन या संस्कृतीचा सर्वाधिक चाहता मी आहे. मी एक राज्यकर्ता म्हणून चांगला मृदुंग वादक आहे. मी नमनातला पण मृदुंग वाजवू शकतो आणि राजकारणातला पण, असेही विनोदी शैलीत मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले..
तालुक्यातील आरजीपीपीएल प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे व निरामय रुग्णालय सुरु करण्याबाबत मी प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी जिल्हापरिषद निवडणुकीत महायुतीच्या ५० पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीवर महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वासही पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button