
हातीस उरुसामध्ये संपर्क युनिक फाउंडेशन रत्नागिरी ची विनामूल्य रुग्ण सेवा सुविधा

रत्नागिरी… कोकणातील मोठा उरूस हा रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथे पीर बाबर शेख यांचा होत असतो.दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी फार लांबून येत असतात.
यंदा 2 व 3 फेब्रुवारी 2026 रोजी दोन दिवस हा उरुस साजरा होत आहे,येणा-या भाविकांना जर आकस्मिक काही किरकोळ आकस्मिक वैद्यकीय उपचाराची गरज पडली तर प्रथमोपचार म्हणून संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी यांचे तेथे रुग्ण मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे.दरवर्षी अशा प्रकारची सेवा संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी करीत असते यंदाचे हे आठवे वर्ष आहे ,सेवा केंद्र शुभारंभ प्रसंगी अध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी जिल्हा समिती अध्यक्ष जमीर खलफे, सचिव युसुफ शिरगावकर उपस्थित होते. या प्रथमोपचार केंद्राचा गरज भासल्यास लाभ घेण्याचे आवाहन भाविकांना करण्यात आले आहे.या उपक्रमाला हातीस ग्राम विकास मंडळ,मातीस यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.




