चिपळुणातून बेकायदा गुरे वाहतूक अलोरे पोलिसांनी केला दोघांवर गुन्हा दाखल…


चिपळूण येथून २७ रोजी होणार्‍या बेकायदा गुरे वाहतुकीप्रकरणी अलोरे पोलिसांनी बुधवारी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून ७ म्हैशी, १ गाय व टेम्पो असा मिळून सुमारे १४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामुळे अशी वाहतूक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
इसहाक अब्दुल्ला महालुनकर (५७, भोस्ते-खेड), राजेंद्र बाबू तांबे (५०, शिव बौध्दवाडी नं. २, खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून कापड व्यावसायिक विशाल बसंत ओसवाल (४०, अलोरे मार्केट) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले आहे, महालुनकर व तांबे हे आपल्या ताब्यातील टेम्पोमधून परवाना नसतानाही तसेच पाणी, खाद्य न देता आखुड दोरी बांधून १ लाख रुपये किमतीची मुरा जाफरा जातीची गाभण म्हैस, तीन प्रत्येकी ९० हजार रुपये किमतीच्या मुरा क्रॉस जातीच्या दुभत्या म्हशी, ८० हजार रुपये किमतीची मुरा क्रॉस जातीची दुभती म्हैस, ९० हजार रुपये किमतीची मुरा क्रॉस जातीची गाभण म्हैस, १ लाख रुपये किमतीची मुरा क्रॉस जातीची दुभती म्हैस, ७० हजार रुपये किमतीची जर्सी जातीची जातीची दुभती गाय अशी ८ जनावरे व टेम्पो असा मुद्देमाल जप्त केल्याचे नमूद केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button