
रत्नागिरी शहराजवळील टाकळेवाडी-फणसोप येथे गरम पाणी अंगावर पडल्याने वृद्धा जखमी
रत्नागिरी शहराजवळील टाकळेवाडी – फणसोप येथे गरम पाणी अंगावर पडल्याने वृद्धा भाजून जखमी झाली. ही घटना २८ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. पुष्पलता सदाशिव साळवी (९४, रा. टाकळेवाडी, फणसोप, रत्नागिरी) असे भाजलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. पुष्पलता साळवी यॉं चुलीजवळ बसल्या होत्या. चुलीवर पाणी गरम – करण्यासाठी ठेवलेले होते. यावेळी पुष्पलता यांचा तोल जाऊन खाली कोसळल्या व चुलीवरील गरम पाणी त्यांच्या अंगावर पडले.
www.konkantoday.com




