सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याबदल 23 पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भारतीय जनता पक्षामधून सहा वर्षांसाठी निलंबित


सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध आपला उमेदवारी अर्ज ठेवणे, विरोधी उमेदवाराला मदत करणे अशा प्रकारच्या पक्षविरोधी कारवाया केल्याबदल 23 पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भारतीय जनता पक्षामधून सहा वर्षांसाठी तत्काळ निलंबित करण्यात येत असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे.यामध्ये जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष व जि. प. माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी जि.प. सभापती वंदना किनळेकर, शर्वाणी गावकर, भाजपचे फोंडाघाट भागातील पदाधिकारी राजन चिके यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत भाजपा पक्षाच्यावतीने अधिकृत उमेदवार रिंगणात आहेत. तरीही काही उमेदवारांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवून पक्षशिस्त भंग केला आहे. यासाठी 23 पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी निलंबन करण्याबाबतचे भाजपच्या वरिष्ठांनी आपल्याला आदेश दिले. या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष या नात्याने आपण सहा वर्षांसाठी ही निलंबन कारवाई केल्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button