कोकण नगर पाठोपाठ रत्नागिरी शहरातही अतिक्रमण हटाव मोहीम सुरु होणार


कोकण नगर ही शहराताल एक गजबजलेली बाजारपेठ आहे. अचानक सुरू झालेल्या या मोहिमेमुळे येथील अतिक्रमण केलेल्या गाळेधारक आणि व्यावसायिकांची मोठी तारांबळ उडाली. गाळ्यांमधील महागडे आणि महत्वाचे सामान बाहेर काढण्यासाठी व्यापार्‍यांनाच अवधी मिळाला नाही. अशा परिस्थितीत नौसीन काझी यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाशी चर्चा केली. त्यांनी संबंधितांची बाजू मांडत सामान हलवण्यासानी वेळ देण्याची विनंती केली. त्यांच्या हस्तापामुळे काही काळ कारवाई थांबवण्यात आली. ज्यामुळे व्यापार्‍यांना आपले सामान सुरक्षित स्थळी हलवण्यास अवधी मिळाला. त्यांच्या मध्यस्थीमुळे दुकानदारांना आपले सामान हलवण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत मिळाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button