
राजापूर तालुक्यात सर्पदंशाने आडिवरे-कोंबेतील वृद्धाचा मृत्यू
सर्पदंश झाल्याने राजापूर तालुक्यात आणखी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. मयताचे नाव जयवंत विश्वनाथ नार्वेकर (वय ७० रा. कोंबे, आडिवरे) असे आहे. दि. २४ मे रोजीच्या या घटनेची नोंद पोलीस दप्तरी आता करण्यात आली आहे.
मयत जयवंत नार्वेकर हे घराच्या बाजूला असलेल्या शौचालयाच्या आवाराची साफसफाई करीत असताना त्यांच्या डाव्या पायाला सर्पदंश झाला. त्यांना रूग्णवाहिके ने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे.
www.konkantoday.com




