
राजापूर-लांजातील नद्यांमधील ६० हजार घनमीटर उपसा, आ. किरण सामंत यांचा पुढाकार
राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या पुढाकाराने राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नदीपात्र तर, लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदीतील विलवडे वाकीवाडी येथे गाळ उपसा केला जात आहे. जलसंपदा विभाग व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्या या कामामध्ये आजपर्यंत ६० हजार ९५० घनमीटर गाळाचा उपसा झाला असून उपसा केलेला हा गाळ नदीच्या काठासह काही शासकीय जागेमध्ये टाकण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली. या गाळ उपशामुळे नदीपात्राची रूंदीसह खोलीही वाढली असून त्यामुळे पावसाळ्यातील पूरस्थिती कमी होण्यास फायदा होणार आहे. राजापूर तालुक्यातील अर्जुना-कोदवली नद्यांसह लांजा तालुक्यातील मुचकुंदी नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात संचय झालेला आहे.www.konkantoday.com



