दारूच्या नशेत बोटीवरून पाण्यात पडून खलाशाचा बुडून मृत्यू


दारूच्या नशेत बोटीवरून खाडीच्या पाण्यात पडून खलाशाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील साखरीनाटे, डुंगेरी जेटी, येथे घडली आहे. मदन हवल्दार चौधरी (२३, रा. नेपाळ, सध्या साखरीनाटे, नजफनगर) असे मयत खलाशाचे नाव आहे. या प्रकरणी नाटे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मदन चौधरी हा तरूण मोहसीन अब्दुल्ला कोतवडेकर यांच्या बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. शुक्रवार दि. १६ रोजी मदन दारूच्या नशेत बोटीवर कामासाठी आला होता. रात्री बोटीवरील सर्व खलाशी झोपलेले असताना मदन हा उशिरापर्यंत दारू पित बसला होता. दारूच्या नशेत त्याचा बोटीवरून तोल जावून तो खाडीच्या पाण्यात पडला. सहकार्‍यांनी पाण्यात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही. रविवार १८ रोजी जैतापूर खाडीतील नाटे डुंगेरी येथे पाण्यात मदनचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी बोटीचे मालक मोहसिन कोतवडेकर यांनी नाटे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button