पर्यटन संचालनालय व आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने रत्नागिरी येथे “सागर महोत्स” संपन्न

नवी मुंबई, ) दि.20: पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत जबाबदार पर्यटनाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये तसेच जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून रत्नागिरी येथे सागर महोत्सावाचे आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सावाचे प्रायोजकत्व मे. आसमंत बेनेव्होलेन्स फाऊंडेशन, रत्नागिरी या संस्थेस देण्यात आले होते. त्यानुषंगाने दि.15 ते 18 जानेवारी 2026 या कालावधीत रत्नागिरी शहरातील अंबर हॉल मध्ये सागर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री शैलेश नायक यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास लाभली होती.
सागर महोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्यावतीने पर्यटनास चालना देण्यासाठी ज्या अनेकविधयोजना राबविण्यात येतात त्यासंबंधीत जनजागृती होण्याच्यादृष्टीने विभागीय पर्यटन संचालनालय, कोकण तर्फे स्टॉल उभारण्यात आला होता. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी तसेच नागरिकांना कृषी पर्यटन, किल्ले पर्यटन, अध्यात्मिक पर्यटन, होमस्टे पर्यटन धोरण, 2024, आई योजना, महाबुकींग इत्यादी बाबत माहिती देण्यात आली. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी पर्यटन उपसंचालक, कोकण विभाग, डॉ. प्रज्ञा मनोहर यांनी आपल्या भाषणातून पर्यटनासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थितांनी संचालनालयातर्फे लावण्यात आलेल्या स्टॉलला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. श्री. अजिंक्य लुगडे, सहाय्यक जिल्हा पर्यटन अधिकारी, श्री. मोहित सावळा, प्रकल्प अधिकारी (आई योजना), तसेच श्री. पंकज सावंत यांनी स्टॉलला भेट दिलेल्या उपस्थितांना योजनांची तसेच कोकण विभाग अंतर्गत जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांविषयी विस्तृत माहिती दिली.
उपसंचालक श्रीमती मनोहर यांनी पर्यटनाला चालना देण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येऊ शकतील याबाबत उपस्थितांशी चर्चा केली, अशी माहिती विभागीय पर्यटन कार्यालय कोकण विभाग यांनी पत्रकान्वये दिली.
000 000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button