
मालघर येथील वृद्धाश्रमाला खेतले प्रतिष्ठानतर्फे ब्लँकेट आणि खाऊ वाटप
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथील स्व. श्री. वसंत (बाळासाहेब) खेतले यांची जयंती आणि स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त चिपळूण मालघर येथील आरती निराधार सेवा फाऊंडेशन वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ४० वृद्ध, दिव्यांग लोकांना आणि मुलांना ब्लॅकेट आणि फळांचा वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप खेतले, खजिनदार कुणाल खाकम, मनोहरराव खेतले, पोलीस पाटील सुधाकर खेतले, चिपळूण रिक्षा संघटना अध्यक्ष दिलीप खेतले, ॲड. ज्योत्स्ना काताळकर , ठेकेदार विनय काताळकर, मालघर सरपंच, चारुदत्त सावंत, शंकर घाडे, सीताराम डिंगणकर, विनोद डिंगणकर, रोहित सावंत, विठोबा खेतले, गणेश जाधव, मंगेश (भाई) खेतले, मनोहर खेतले, हेमंत खेतले, श्रीराज खेतले, शिवा खेतले आदी उपस्थित होते.




