
कळवंडे धरणाचा प्रश्न तातडीने साेडवणार, उद्याेगमंत्री उदय सामंत
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कळवंडे धरणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. रस्ते तसेच कुणबी शिक्षण मंडळाच्या चिपळूण व गुहागरसाठीच्या वसतिगृहाचा प्रश्नही मार्गी लावण्याचे वचन त्यानी दिले.
प्रसिद्ध उद्याेजक वसंत उदेग व कळवंडे गावातील 9 वाड्यांमधील ग्रामस्थांनी बुधवारी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. यानिमित्त कळवंडेत आयाेजित कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश साेहळ्यात ते बाेलत हाेते.
ते पुढे म्हणाले की, अनेकाजण स्वतःच्या पदरात काहीतरी पाडून घेण्यासाठी पक्ष प्रवेश करतात. मात्र उद्याेजक वसंत उदेग यांनी काहीही न मागता केवळ गाव व परिसराच्या भल्यासाठी याेग्य ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे केवळ कार्यकर्ते मिळाले नसून एक चांगला उद्याेजक आम्हाला मिळाला आहे. त्यांच्या अनुभवाचाही ायदा करून घेता येणार आहे.www.konkantoday.com




