
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा झरेवाडी येथे विषारी द्रव प्राशन केल्याने तरूणाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा झरेवाडी येथे विषारी द्रव प्राशन केल्याने तरूणाचा मृत्यू झाला. प्रकाश पांडुरंग गोताड (५५, रा. हातखंबा, झरेवाडी) असे मृताचे नाव आहे. प्रकाश याने २५ डिसेंबर रोजी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले होते. यावेळी नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रूग्णालय येथे दाखल केले होते. २९ डिसेंबर रोजी सायंकाळी उपचारादरम्यान प्रकाश यांचा मृत्यू झाला, अशी नोंद पोलिसांत झाली.
www.konkantoday.com




