राजापूरचे गटविकास अधिकारी निवासस्थान पूर्ण परंतु राहण्यास अधिकारीच नाहीत.

. राजापूर येथील पंचायत समिती आवारातील गटविकास अधिकारी निवासस्थान दुरुस्तीच्या नावाखाली पंचायत समितीने गेल्या दोन वर्षामध्ये सुमारे १० लाख रुपये खर्च केला, मात्र सद्यस्थितीत गटविकास अधिकारीच राहत नसल्याने या इमारतीला अधिकार्‍यांची प्रतीक्षा लागून राहिली. आहे. गटविकास अधिकारी राहत नसतील तर हा खर्च का करण्यात आला, असा प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.गटविकास अधिकारी निवासस्थानसाठी प्रथम पंचायत समिती सेस कार्यक्रमातून सन २०२३-२४ साठी ४ लाख १४ हजार ४९८ रुपये तर जि. प. सेस पदाधिकारी, अधिकारी निवासस्थान दुरुस्ती २०२४-२५ या हेडखाली ५ लाख ८२ हजार ५१७ रुपये निधी खर्च करण्यात आले आहेत. या दोन्ही हेडखालील करण्यात आलेली कामे पूर्ण करण्याची मुदत १५ जानेवारी २०२५ अशी होती आणि एकाच ठेकेदाराला ही कामे देण्यात आली होती. निवासस्थानी अधिकारीच राहत नसतील हा दुरुस्तीचा घाट का घालण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी फक्त छप्पर दुरुस्ती करीत इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली. मग एवढा निधी गेला कुठे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. नूतन आमदार किरण सामंत यांनी निवडून येताच पंचायत समितीमधील सर्वच विभागात एकाच दालनामध्ये येण्यासाठी सुसज्ज अशी इमारत उभारणार, असे जाहीर केले असताना मात्र नवीन इमारत उभारण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून आरोग्य विभागासाठी बांधण्यात येत आहे. यामुळे पंचायत समितीचे अधिकारी आमदारांच्या आदेश धुडकावत असल्याचे समोर येत आहे. गेली अनेक वर्षे नागरिकांमधून पंचायत समितीचा कारभार एकाच दालनात यावा, यासाठी मागणी केली जात होती. याची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी नवीन उभारण्याची घोषणा केली. पंचायत समितीचा कारभार हा सध्या प्रशासनाच्या हाती असल्याने मनमानी कारभार चालू असल्याचे यावरून दिसत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button