
रत्नागिरी शहरात मच्छी मार्केट येथे उभ्या करून ठेवलेल्या कारला आज सकाळी अचानक आग लागल्याने मोठे नुकसान
रत्नागिरी शहरातील मच्छीमार्केट परिसरात एका इमारतीच्या बाहेर उभ्या करून ठेवलेला कारला अचानक आग लागल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे आज सकाळी ही घटना घडली सदर गाडीच्या मालकाने स्कोडा कंपनीची आपली कार इमारतीच्या बाहेर उभी करून ठेवली होती मात्र या उभ्या करून ठेवलेल्या कारने सकाळच्या सुमारास अचानक पेट घेतला. व बघता बघता आगीने संपूर्ण कारला वेढले त्यातच गाडीच्या टायरने भेट घेतल्याने कार पूर्णपणे जळून गेली आग लागली त्यावेळी सुदेवाने कार मध्ये कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही मात्र आगीच्या भडक्यात कार पूर्णतः जळून खाक झाली. ही घटना नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला कळविताच अग्निशामक पथक घटनास्थळी आले नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेने आग विझवण्याचा प्रयत्न केला स्कोडा कारला अचानक कशी काय आग लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही




