
लांजा तालुक्यातील वाकेड फाटा येथे रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू
लांजा तालुक्यातील वाकेड फाटा येथे रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने उडविले. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला. अधिक उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. स्वप्निल गणपत बराम (40, रा. वाकेड, ता. लांजा) असे या अपघातात मृत्यू झालेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली.स्वप्निल बराम हे सकाळी आठच्या सुमारास चालत वाटूळ येथे कामाला जात होते. रस्त्यातून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचे वडील गणपत बराम यांनी अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या16 छजत ठरींपर झरसश1बाबत जिल्हा शासकीय रुग्णालयात पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.




